संगमेश्वर तालुका उत्तर विभाग बौद्धजन शिक्षण प्रसार संघ

संगमेश्वर तालुका उत्तर विभाग बौद्धजन शिक्षण प्रसार संघ, स्थापना २० एप्रिल १९५९ संस्थेचे कार्यक्षेत्र हे तालुका संगमेश्वर उत्तर विभाग, जि. रत्नागिरी , मुंबई व महाराष्ट्र राज्य असे आहे.
संस्था संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह, मुक्काम दिवाणवाडा, नावडी, संगमेश्वर एस. टी डेपो शेजारी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी (महाराष्ट्र) येथे अनुदानित वसतिगृह ४० विद्यार्थासह सुरू आहे.
संस्थेची ध्येय्य आणि उद्धीष्टे
१) संगमेश्वर तालुक्यातील बहुजन समाजाला एकसंघ करणे, त्यांच्यात एकीची समानतेची, बंधुत्वाची व सहकार्याची भावना जागृत करणे.
२) विविध राष्ट्रीय सण, जयंतीउत्सव, साजरे करणे .
३) अंधश्रध्दा निर्मुलन व व्यसन मुक्ती कुटुंबकल्याण, व पर्यावरण इत्यादी बाबत जनतेत जागृती निर्माण करणे.
४) वधुवर सुचक केंद्र चालविणे व सामुहिक विवाहास प्रोत्साहन देणे.
५) ग्राहक संस्था, पत संस्था, सहकारी बॅक, स्थापन करणे किंवा चालविणा-या संस्थांना सहकार्यकरणेकरणे.
५) आरोग्य विषयी मेडीकल कॅम्प, रक्तदान शिबीर, नेत्र चिकीत्सा आयोजित करून धर्मादाय स्वरूपाचे दवाखाने स्थापन करणे, व गरीब आणि गरजूंना मोफत औषधोपचार देण्याबाबत प्रयत्न करणे.
६) नैसर्गिक, अनैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना योग्य ती मदत करणे अथवा शासकिय निमशासकिय मदत मिळवून देणे. ७) गुणवंत, होतकरू विद्यार्थाना शैक्षणिक मदत करणे.
८) शिक्षण, कला, क्रिडा, साहित्य यांची जोपासना व प्रसार करणे.
९) विपश्यना, साधना व शिबीरे आयोजित करणे.
संस्थेचे नियम व नियमावली अटी शर्ती मान्य असणा-या विभागातील १८ वर्षावरील कोणाही स्त्री-पुरुषांना संस्थेचे सभासद अथवा देणगीदार होता येईल.
Bank Name – Union Bank of India, Branch – Mazgaon, Mumbai. 400 010.
A/C.No. 318302010024146 | IFSC No. UBIN0531839
धन्यवाद
कार्यकारी मंडळ
संगमेश्वर तालुका उत्तर विभाग बौद्धजन शिक्षण प्रसार संघ,
98336 34062 | e-mail : stsps.org@gmail.com




All the best for future