कु. प्रसिद्धी प्रकाश कांबळे स्पेशीअल ऑलिंपिक सवर्ण पदक विजेता

स्पेशियल ऑलिंपिक स्वर्णपदक विजेता कु. प्रसिद्धी प्रकाश कांबळे हिचे आई वडील आयू. प्रकाश धर्माजी कांबळे (रिक्शा चालक) व सुषमा प्रकाश कांबळे (गृहिणी) तसेच भाऊ कु. स्वराज प्रकाश कांबळे व आर्यन प्रकाश कांबळे असा यांचा साधारण परिवार चेंबुर स्थित पंचशील नगर येथे राहतो आहे.

Image

प्रसिद्धीने सहविपर्यंत शिक्षण केले आहे परंतु ती फक्त लिखाण करायची तिच्या कडून पाठांतर होत नसे किंवा तिच्या लक्षात राहत नसे म्हणून तेथील शिक्षकांनी तिचा IQ टेस्ट घेण्यास सांगून गरज वाटल्यास स्पेशियल शाळेत प्रवेश घेण्यास संगितले. IQ टेस्ट केल्यास तिचा IQ कमी आला व ती कानाने कमी ऐकू येणे व व्यवस्थित बोलणे करुशकत नसल्याने पर्यायाने तिला कॅनची मशीनही व्परण्यात येते.

Image

सुलभा स्पेशियल हायस्कूल टिळकनगर येथे प्रवेश घेऊन प्रसिद्धीच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. सदर शाळेतील क्रीडा कार्यक्रमात भाग घेऊन प्रसिद्धीने व्हेकेशन ट्रेनिंग सेंटर मध्ये व्यावहारिक शिक्षण दिले जाते. प्रसिद्धीने शाळेतील मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांच्या मदतीने टेबल टेनिस, होंत बॉल, रनिंग, कॅरम, लोंग जंप, हाय जंप, आणि स्विमिंग खेळांमध्ये व स्पर्धांमध्ये सहभागी होत राहिली. प्रसिद्धीने विशेष स्विमिंग मध्ये सतत ६ वर्ष सराव करत असल्याने शाळे मार्फत स्विमिंग कॅम्प करिता बंगलोर, गुजरात, दिल्ली या राज्यांमध्ये पाठविण्यात आले. या तीनही राज्यांन मधील सरवाच्या उत्तम कामगिरी पाहून प्रसिद्धीची निवड ही स्पेशियल ऑलिंपिक वर्ल्ड गेम्स जर्मनी (बर्लिन) करिता करण्यात आली.

जर्मनी (बर्लिन) येथे १७ जून ते २५ जून २०२३ होत असलेल्या स्पेशियल ऑलिंपिक वर्ल्ड गेम्स दरम्यान २१ जून २०२३ फायनल मध्ये प्रसिद्धीने ७ देशांच्या प्रतिस्प्रधींना मागे ताकत २५ मी. फ्री स्टाइल मध्ये गोल्ड मेडल पटकावले तसेच ४ x २५ रिले मध्ये सिल्व्हर मेडल आणि ५० मी.  पाचव्या क्रमांकाचे पदक प्राप्त करून भारत देशाचे प्रतिनिधित्व करून जगात राज्याचे व भारत देशाचे मोठे केले.

खलील QR कोड द्वारे आपण सहकार्‍य निधी पाठऊ शकता

Image Not Found
Image Not Found

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *